अवचित
Photo link :- https://goo.gl/images/abg54T
अवचित नव्या वळणावरती
भेट आपली होईल का ?
मग तुही अशा सांजवेळी
नजरेने इशारे देशील का?
हा भ्रम असो वा स्वप्न नवे
वाट माझी पाहशील का?
मग चाहूल माझी घेण्यासाठी
आतुर कान तुझे होतील का?
लपले आजवर भाव मनीचे
न सांगताच तुला कळतील का?
मग विसरुनी तुही भान जगाचे
हातात हात माझ्या देशील का?
-उल्का पवार
#अवचित# #स्वप्न# #भेट# #जग# #भ्रम# #भान# #हात # #आतुर# #dream# #meet# #love# #hurt# #Eyes# #yours# #hands# #love_Forever#

Nice
ReplyDelete